हत्येसाठी शस्त्र पुरवणारा व्यक्ती ठार
► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील व्यापारी गोपाल खेमका यांच्या हत्येतील संशयित आरोपी विकास उर्फ राजा पोलीस चकमकीत ठार झाला आहे. मंगळवारी मालसलामी पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास ठार झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही चकमक एका वीटभट्टीच्या चेंबरजवळ झाली. या चकमकीनंतर परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात सहभागी असलेला आरोपी उमेश याला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून विकासचे नाव पुढे आले असून त्याने हत्येसाठी शस्त्रे पुरविल्याचा दावा केला जात आहे. गोपाल खेमका या पाटण्यातील प्रसिद्ध व्यापाऱ्याची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी बिहारमधील वातावरण ढवळून निघाले आहे.









