भीमसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : देशासह राज्यामध्येही महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. हिंदु मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात येत आहे. तर मणिपूर येथे समाजाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि महिलांना संरक्षण द्यावे, अशा मागणीचे निवेदन भीमसेनेतर्फे करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मणिपूर येथे मागासवर्गीय समाजातील महिलांना विवस्त्र करून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही अपमानास्पद गोष्ट आहे. ट्रायबल असोसिएशनकडून राष्ट्रीय महिला आयोगाला दि. 12 जून रोजी तक्रार केली होती. तक्रार देवून 38 दिवसांचा कालावधी उलटला तरी कोणतीच कारवाई केली नाही. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकार जागे झाले आहे. याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मादार, अक्षय के. आर. आदी उपस्थित होते.









