बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीवर कश्मीर येथील पहलगामात दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या क्रूवर दगडफेक झाल्याची अफवा पसरली आहे. याबबात इमरान हाश्मीने ट्विट करत माहिती दिली आहे. दगडफेकीच्या घटनेत मी जखमी झाल्याची बातमी चुकीची असल्याचे त्याने ट्विट करत सांगितले आहे.
अभिनेता इम्रान हाश्मीने ट्विटमध्ये काय म्हटले आहे
काश्मीरमधील लोक अतिशय प्रेमळ आणि स्वागतार्ह आहेत, श्रीनगर आणि पहलगाममध्ये शूटिंग करताना खूप आनंद झाला. दगडफेकीच्या घटनेत मी जखमी झाल्याची बातमी चुकीची असल्याचे त्यांने म्हटले आहे.
नेमकं काय घडल
इम्रानचा आगामी चित्रपट ‘ग्राऊंड जीरो’चे कश्मीर येथे शुटिंग सुरु आहे. शूटिंग संपल्यानंतर इम्रान यूनिट घेऊन बाजारात फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. पहलगाम पोलीस ठाण्यात इम्रानने तक्रार दाखल केली आहे. पहलगामच्या आधी इम्रान श्रीनगर येथे या चित्रपटाचे शूटिंग करत होता. श्रीनगर येथील शेड्युल संपवून ‘ग्राउंड झिरो’च्या टीमने पहलगाम येथे चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. हा चित्रपट म्हणजे एक मिलिटरी ड्रामा आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी एका लष्कर अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई ताम्हणकर या चित्रपटात हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
Previous Articleहमारा देश व भिमक्रांतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन
Next Article ग्रामीण कुली संघटनेचा जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा









