30 दशलक्ष डॉलर्सच्या प्रभावहीन विमानाला ठरवतोय शक्तिशाली
भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या संघर्षानंतर चीन स्वत:चे लढाऊ विमान जे-10 सी विकण्यासाठी मोठमोठे दावे करत आहे. राफेल विरोधात निष्प्रभ ठरलेले जे-10सी लढाऊ विमान विकण्यासाठी चीन अतिशयोक्तीपूर्ण दावे करत आहे. या लढाऊ विमानासोबत पीएल-15 क्षेपणास्त्रही चीन विकू पाहत आहे. याच क्षेपणास्त्राला भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणा भेदता आली नव्हती.
चिनी लढाऊ विमान जे-10सी वरून चीनचे दावे पोकळ आहेत, कारण जे-10सीमध्ये चीन सांगत असलेली क्षमताच नाही असे द वॉर झोनच्या अहवालात म्हटले गेले आहे. जे-10सी लढाऊ विमान एका मर्यादेपर्यंतच उपयुक्त असल्याचे मत रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टीट्यूट थिंक टँकमधील एअरपॉवर आणि टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ रिसर्च फेलो जस्टिन ब्रोंक यांनी व्यक्त केले आहे.
चीनकडून ग्राहकांचा शोध सुरू
जे-10सी लढाऊ विमानाला चीन 4.5 पिढीचे लढाऊ विमान मानतो आणि त्याने पाकिस्तानी वायुदलाला जे-10सी लढाऊ विमाने पुरविली आहेत. ज्या दिवशी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अ•dयांना लक्ष्य केले होते, तेव्हापासून पाकिस्तानी लढाऊ विमानांनी एकदाही उ•ाण केले नाही. कारण पाकिस्तान भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांमुळे घाबरून गेला होता असा दावा भारताच्या वायुदलाचे माजी प्रमुख संजीव कपूर यांनी केला.
चीनकडून डिझाइन्सची चोरी
जे-10सी लढाऊ विमान एक सिंगल इंजिन, मल्टीरोल फायटर जेट असून त्याची निर्मिती चीनची कंपनी चेंगदू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने केली आहे. हे जे-10 सीरिजमधील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान असून यात एईएसए रडार, स्टील्थ-फ्रेंडली डिझाइन आणि आधुनिक बीव्हीआर क्षेपणास्त्र (पीएल-15) सामील आहे. 2022 साली पाकिस्तानने याला भारताच्या ‘राफेल’साठी प्रत्युत्तर ठरविले होते. जे-10सी लढाऊ विमान चीनने इस्रायलच्या रद्द झालेल्या लावी प्रोजेक्टमधून डिझाइन्सची चोरी करत निर्माण केले आहे.
इंजिनच्या विश्वसनीयतेबद्दल संशय
जे-10सी चा एअरफ्रेम अत्यंत जुना ठरला असून यात केवळ नवे एवियोनिक्स वापरण्यात आले आहेत. यात डब्ल्यूएस-10 इंजिन असून याच्या विश्वसनीयतेवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही आणि हे वारंवार अपयशी ठरणे, थ्रस्ट-टू-वे रेशियोत कमजोरीला तोंड देत असते. डब्ल्यूएस-10 इंजिनला अनेकदा कमजोरींमुळे अपग्रेड करण्यात आले आहे, तरीही ते विश्वसनीय ठरलेले नाही असे वॉरझोनने म्हटले आहे. तर भारताच्या एसयू-30एमकेआय लढाऊ विमानात एएल-31 इंजिन वापरण्यात आले असून ते जे-10 सीच्या तुलनेत अधिक विश्वसनीय आणि लढाऊ मोहिमांसाठी उपयुक्त आहे.
कागदावरच शक्तिशाली
चीन या लढाऊ विमानाला केवळ 30-35 दशलक्ष डॉलर्समध्ये विकू पाहत आहे. जे-10सीमधील रडार केवळ कागदोपत्री प्रभावी आहे, यात केएलएजे-7ए एईएसए रडार असून याची कक्षा सुमारे 200 किमी सांगण्यात येतेय, परंतु याच ईसीसीएम क्षमता पाश्चिमात्य किंवा भारतीय एईएसए रडार्सच्या तुलनेत कमकुवत मानली जाते. याचबरोबर या लढाऊ विमानात इन्फ्रारेड सर्च एंट ट्रॅक क्षमताही मर्यादित असून यात हेड्स-अप डिस्प्ले आधारित हेल्मेट-माउंटेड सिच्युएलशन सिस्टीम राफेल किंवा तेजस एमके-1 च्या स्तराची नाही.









