प्रतिनिधी/ बेळगाव
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, कर्नाटक विकास ग्रामीण बँक निवृत्त नोकर संघटना, गणेश मंदिर ट्रस्ट वैभवनगर व वैभवनगर हितरक्षण संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राजयोगातून सशक्तीकरण या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
राजयोगिनी अंबिका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. बी. के. विद्या यांनी प्रास्ताविकात ‘आत्मस्थैर्याची गरज व सशक्तीकरण आणि आध्यात्मिक ज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. राजयोगिनी बी. के. अंबिका यांनी आधी स्वत:ला समजून घेतले तरच परमात्मा समजून घेता येणार आहे. परमात्म्यामुळे सर्व शक्ती ज्ञानप्राप्ती होते. जीवनात सुख-शांती मिळायला हवी असेल तर परमात्म्याचे नामस्मरण करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
निवृत्त पोलीस उपअधीक्षक आर. बी. पाटील, एम. एस. पाटील, सुरेश वैद्य, के. ताळे, बी. के. सुलोचना, बी. के. महादेवी, बी. के. मीनाक्षी, बी. के. रूपा, बी. के. दत्तात्रय आदी उपस्थित होते. राजयोगामुळे सन्मार्गाच्या दिशेने वाटचाल करता येते, अशी शिकवण या कार्यशाळेत देण्यात आली.









