विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देताना स्वाती कुलकर्णी. शेजारी इतर.
प्रतिनिधी / बेळगाव
महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून स्वाती कुलकर्णी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांची क्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी तनुश्री देशपांडे, राधा मुचंडी, प्राचार्य एच. एम. पाटील, एम. बी. होनगेकर, मनोज मायकल यासह इतर उपस्थित होते.









