नवी दिल्ली :
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचसीएल टेक यांनी एंटरप्राइझ सोल्यूशन्स तयार करण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी गुगल क्लाउडसोबत भागीदारी वाढवली आहे. या अंतर्गत एचसीएल टेक 25,000 अभियंत्यांना गुगल जेमिनीवर सक्षम करणार असल्याची माहिती आहे.
गुगल क्लाउडच्या नवीनतम जेनएआय तंत्रज्ञानावर अभियंत्यांना सक्षम करून, कंपनीने त्यांच्या एआय प्रकल्पांच्या विविध टप्प्यांवर ग्राहकांना अधिक चांगले समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
एचसीएलटेकचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सी विजयकुमार म्हणाले की, हे सहकार्य उददुत चे सर्वात सक्षम आणि मोठ्या प्रमाणात जेमिनी मॉडेल वापरून एचसीएल टेकचे नाविन्यपूर्ण जेनएआय सोल्यूशन्स बाजारात आणेल. आम्हाला विश्वास आहे की हे एचसीएल टेकच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओद्वारे विस्तार करेल.









