नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर येथे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि २० मार्च 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याने राज्याचे संचालक कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 30 ऑक्टोबर पासून संतोष पवार आणि अनिल जाधव बेमुदत उपोषणाला बसले आहेत. प्रत्यक्ष बाधित ज्यांच्यासाठी बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. असे वाडा नगरपंचायतीमधील तीन कर्मचारी बेमुदत आणि दोन कर्मचारी साखळी उपोषणास बसले आहेत. बेमुदत उपोषणाला पाठिंबा म्हणून सावंतवाडी नगर परिषदेचे जेष्ठ कामगार नेते, सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष देविदास आडारकर आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे सचिव टिळाजी परशुराम जाधव एक दिवस सहभागी झाले. शासनाने लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्यास प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील कर्मचारी उपोषणात सहभागी होणार असल्याबाबत कामगारांची मानसिकता तयार झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









