धनंजय महाडिक यांच्या नेतृत्त्वात कारखान्यास प्रचार सभा
निपाणी : निपाणी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ आज बेडकीहाळ येथील श्री व्यंकटेश्वर साखर कारखाना सभागृहात राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, अमल महाडिक यांच्या नेतृlवाखाली प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी कारखान्याच्या कर्मचार्यांनी जोल्ले यांना पाठाRबा जाहिर केला.

यावेळी शशिकला जोल्ले म्हणाल्या, की महाडिक आणि जोल्ले कुटुंबाचे अनेक काळापासून अतूट नाते आहे. या नात्याचा पाfरणाम म्हणून धनंजय महाडिक दोन दिवस आपल्या प्रचारात व्यस्त असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी पाठाRबा दिल्याबद्दल कारखान्याच्या कर्मचार्यांचे आभार मानले.
यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.









