कोल्हापूर :
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया सोमवारपसून सुरू झाली असून ज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख व पंचायत समितींना देण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे जि.प.तील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदलीचे वेध लागले आहेत.
जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने बदलीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू केली आली आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या वेळेत होण्याची शक्यता आहे. सर्व विभाग प्रमुख व पंचायत समितींना पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी तसेच पंचायत समितींनी सेवा ज्येष्ठता यादी तयार करून ती मुदतीत प्रसिद्ध करावी असे पत्रात नमूद आहे.
- जिल्हास्तरीय बदलीचा कार्यक्रम
– पंचायत समितींनी ज्येष्ठता यादी 12 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेला सादर करणे.
– एकत्रित यादी 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध.
सूचना व हरकती नोंदविण्याची मुदत 18 ते 27 एप्रिल.
अंतिम सेवाज्येष्ठता यादी दोन मे रोजी प्रसिद्ध.
प्रत्यक्ष बदलीसाठी समुपदेशनचा कालावधी 5 मे 15 मे.
पंचायत समिती स्तरावरील बदलीचा कार्यक्रम
– ज्येष्ठता यादी तयार करून प्रसिद्ध करणे 12 एप्रिल.
– सूचना व हरकती नोंदविण्याची मुदत – 13 ते 22 एप्रिल.
– अंतिम सेव ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे – 30 एप्रिल
– प्रत्यक्ष बदलीसाठी समुपदेशनचा कालावधी -16 मे 25 मे








