ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याची विभागणी करुन सर्वसामान्यांच्या जीवनमानात काही बदल होणार आहे का? स्वतंत्र जिल्ह्याच्या निर्मितीसाठी जो निधी खर्ची पडणार आहे, तो सध्याच्या विकासासाठी खर्च करा, असे मत राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्ह्याची विभागणी करून पिंपरी चिंचवडच्या बाजूचा भागासाठी वेगळा जिल्हा निर्माण करावा. त्या जिह्याला शिवनेरी असं नाव द्यावं, अशी मागणी भाजपचे आ. महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावर कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली.
कोल्हे म्हणाले, शिवनेरी जिह्याच्या निर्मितीची मागणी होत आहे. शिवनेरी या नावाला विरोध नाही. पण ही मागणी राजकीय आहे का? या मागची व्यवहार्यता तपासली पाहिजे. शिरूर लोकसभेवर भाजपचा डोळा आहे. त्या अनुषंगाने शिवनेरी जिल्ह्याची मागणी केली जातीये का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उलट जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या शिरूर लोकसभेतील तालुक्याच्या शाश्वत विकासावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.








