बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांनी बुधवारी सायंकाळी बसव कॉलनीला भेट देऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या .

यावेळी माजी आमदार फिरोज सेठ यांनी, हा मतदारसंघ मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे राजू सेठ यांना निवडून दिला तर या मतदारसंघात स्वच्छ पाणी, आणि चांगल्या सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन दिले.

कॉलनीतील नागाfरकांनी त्यांचे स्वागत केले व भेट दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.









