वृत्तसंस्था/ मुंबई
यजमान भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघामध्ये एकमेव कसोटी सामना येथे 14 ते 17 डिसेंबर दरम्यान खेळविला जाणार आहे. इंग्लंड महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू एम्मा लँबने दुखापतीमुळे या कसोटीतून माघार घेतली आहे.
25 वर्षीय इमा लँबला पाठदुखापतीच्या वेदना सातत्याने होत आहेत. येथील एका तज्ञ डॉक्टरची तिने भेट घेऊन या दुखापतीवर त्यांच्याकडून सल्ला आणि वैद्यकीय उपचार करवून घेतला. या दुखापतीवर ती वैद्यकीय उपचार करवून घेण्यासाठी मायदेशी परतणार आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात माया बाऊचर आणि डावखुरी फिरकी गोलंदाज क्रिस्टी गॉर्डन यांचा समावेश केला आहे.
इंग्लंड संघ – टॅमी ब्युमाँट, डॅनी वेट, माया बाऊचर, अॅलिस कॅप्से, केटी क्रॉस, चार्ली डीन, सोफीया डंकले, लॉरेन गिलेर, क्रिस्टी गॉर्डन, अॅमी जोन्स, बेस हिथ, हिथेर नाईट, नॅट सिव्हर ब्रंट आणि लॉरेन बेल.









