वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
एम्मा राडुकानूने सातव्या मानांकित मार्टा कोस्ट्युकचा सलग सहाव्यांदा पराभूत केले. तिने येथे सुरू असलेल्या वॉशिंग्टन डीसी ओपनमध्ये मार्टावर 7-6 (6-4), 6-4 अशी मात केली.
कोस्ट्युक पहिल्या फेरीत बाहेर पडण्याची ही सलग पाचवी स्पर्धा होती. रोममध्ये चौथ्या फेरीतही तिला पराभव पत्करावा लागला. रोममध्ये 11 मे नंतर तिने एकही सामना जिंकला नाही. 2021 मध्ये यूएस ओपन जिंकणारी 46 व्या क्रमांकाची राडुकानू पुढील सामन्यात चारवेळची विजेती नाओमी ओसाकाशी लढेल. ओसाकाने युलिया पुतिनत्सेवाविरुद्ध 6-2, 7-5 असा विजय मिळविला.
हार्डकोर्ट स्पर्धेत पुरुष विभागात कॅमेरॉन नॉरीने दुसऱ्या क्रमांकाच्या लॉरेन्झो मुसेटीला 3-6, 6-2, 6-3 असे पराभूत केले. इटालियन खेळाडू मुसेटीला गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये दुखापत झाली होती आणि त्याला उपांत्य फेरीत खेळणे थांबवावे लागले होते. विम्बल्डनमध्ये मुसेटीला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. वॉशिंग्टनममध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या होल्गेर रुनेने पाठीच्या दुखापतीमुळे मंगळवारी त्यांच्या सामन्यापूर्वी माघार घेतली. 45 वर्षीय विल्यम्सने सोमवारी डीसी ओपनमध्ये दुहेरीत विजय मिळविला









