वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये न्यूझीलंड आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका नुकतीच झाली. न्यूझीलंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील गेल्या रविवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात युएईचा वेगवान गोलंदाज जुनेद सिद्दिकी याच्याकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याने त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.
मैदानावर सिद्दकीकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाला. सिद्दकीकडून अशी घटना दोनवेळा घडल्याने त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. आता त्याला मिळणाऱ्या मानधन रकमेतील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल.









