चराठा गावचे उपसरपंच अमित परब यांना करावा संपर्क
सावंतवाडी / प्रतिनिधी
गेली चार ते पाच दिवस सिंधूदुर्ग जिल्ह्य़ात ज्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी चराठा गावाचे उपसरपंच अमित परब यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेत चराठे गावात कुठलीही पडझड किंवा कुठल्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी लगेचच मदत कार्य मिळावे , या हेतूने आपली टीम सज्ज ठेवली आहे. या टीममध्ये भारतीय जनता पक्षाचे शक्ती केंद्र प्रमुख ओंकार पावसकर ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर, सदस्य अविनाश जाधव. महेश पांचाळ श्रीधर बोंद्रे, सुनिल परब, विलास परब, मुकेश परब, रामचंद्र मसुरकर, रजत ऐकणेकर, दत्तप्रसाद कंलगूटकर, मंगेश सुभेदार, गजानन परब, क्लाटस फर्नांडिस. यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्यांच्या साथीला आहेत. तसेच कूठलीही मदत लागल्यास भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व श्री. विशाल परब यांनी मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले आहे .९४०४७४१००८ या क्रमांकावर संपर्क साधावा .









