खराब हवामान ठरले कारण
वृत्तसंस्था/ इरोड
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर हे प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला खराब हवामानामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. बुधवारी सकाळी तामिळनाडूच्या इरोडमध्ये ही घटना घडली आहे. हवामान अनुकूल झाल्यावर त्यांच्या हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले आहे.
श्री श्री रविशंकर हे हेलिकॉप्टरद्वारे बेंगळूर येथून तिरुपूरच्या दिशेने प्रवास करत होते. हेलिकॉप्टरमध्ये रविशंकर यांच्यासह त्यांचे दोन सहाय्यक तसेच एक वैमानिक होता. खराब हवामानामुळे वैमानिकाने उकिनियममध्ये हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केल्याची माहिती कदम्बूर येथील पोलीस निरीक्षक सी. वडिवेल कुमार यांनी दिली आहे. हे हेलिकॉप्टर सुमारे तासभर गावात थांबून होते असे स्थानिक लोकांनी सांगितले आहे.









