सिंगापूरला जात असताना जळल्याचा वास आल्याने सावधगिरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तिऊचिरापल्लीहून सिंगापूरला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इंडोनेशियामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाडानंतर पायलटने हा निर्णय घेतला. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. तपासणी केल्यानंतर विमानात कोणताही दोष आढळला नाही.
इंडिगो एअरलाइन्सचे 6ई-1007 हे विमान तिऊचिरापल्लीहून सिंगापूरला जात असताना वाटेत पायलटला विमानात काहीतरी जळल्याचा वास आला. त्यानंतर लगेचच वैमानिकाने निर्धारित प्रक्रियेनुसार विमान जवळच्या विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून हिरवा कंदील मिळताच सदर विमान इंडोनेशियातील मेदान भागातील क्वालानामू विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. लँडिंगनंतर विमानाची तपासणी केली असता, सुऊवातीला विमानात कोणताही दोष आढळून आलेला नाही. मात्र त्याची अधिक तपासणी सुरू करण्यात आली. सविस्तर तपासणीनंतरच विमानाला उ•ाण करण्याची परवानगी देण्यात आली. तत्पूर्वी विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने सिंगापूरला पाठवण्यात आले.
यापूर्वी एप्रिलमध्येही इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे तेलंगणातील शमशाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाने बेंगळूरहून वाराणसीला उ•ाण केले होते. लँडिंगच्या वेळी विमानात 137 प्रवासी होते.









