पाटणा-दिल्ली विमानात होते 181 प्रवासी
वृत्तसंस्था/ पाटणा
इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचे शुक्रवारी सकाळी पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंडिगोच्या पाटणा ते दिल्ली विमानाच्या इंजिनमध्ये टेकऑफनंतर काही वेळाताच बिघाड झाल्यामुळे विमानाचा समतोल बिघडला. पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (एटीसी) संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. यानंतर विमान खाली आणण्यात आले. इमर्जन्सी लँडिंग सुखरुपपणे झाल्याने विमानातील सर्व 181 प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
इंडिगोच्या विमानाने पाटणा येथील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 8.37 वाजता उ•ाण केले. उ•ाणानंतर अवघ्या 3 मिनिटात विमानाचे एक इंजिन निकामी झाले. त्यानंतर पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला इंजिन बंद झाल्याची माहिती दिल्यानंतर एटीसीने त्याला इमर्जन्सी लँडिंग करण्याची परवानगी दिली. यादरम्यान विमानतळावर अलर्ट घोषित करून आपत्कालीन लँडिंग प्रोटोकॉल लागू करण्यात आले. या प्रोटोकॉल अंतर्गत सर्व उ•ाणे बंद करण्यात आली. यासोबतच ऊग्णवाहिका, अग्निशमन दल आदी अत्यावश्यक सेवा धावपट्टीच्या दिशेने पाठवण्यात आल्या. सकाळी 9.11 वाजता विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या दरम्यान कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. त्यानंतर पर्यायी विमानाने सर्व प्रवाशांना दिल्लीला पाठविण्यात आले.









