लखनौहून शारजाहला जात होते इंडिगोचे विमान
वृत्तसंस्था/ जयपूर
जयपूर विमानतळावर रविवारी रात्री उशिरा विमानाचे वैद्यकीय आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. लखनौहून शारजाहला जाणाऱ्या इंडिगो विमानात एका प्रवाशाला हृदयविकाराचा धक्का बसल्याने ही घटना घडली. इंडिगोच्या विमानाने लखनौहून उ•ाण केल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत असताना आत बसलेल्या एका प्रवाशाने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. प्रवाशाची गंभीर स्थिती पाहून विमान मागे वळवून जयपूरच्या हवाई क्षेत्रात आणण्यात आले. रात्री 11.10 वाजता विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. प्रवाशाला तात्काळ विमानातून उतरवून जवळच्या ईएचसीसी ऊग्णालयात पाठवण्यात आले. सदर प्रवासी एक 23 वषीय तऊण असून त्याला ऊग्णवाहिकेने उपचारासाठी पाठविण्यात आले. नंतर मध्यरात्री 12.50 वाजता इतर प्रवाशांना शारजाहकडे रवाना करण्यात आले. या विमानात सुमारे 190 प्रवासी होते. मात्र, या वैद्यकीय आणीबाणीमुळे विमान जयपूर विमानतळावर दीड तासाहून अधिक काळ थांबले. सुरुवातीला एटीसीची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनात खळबळ उडाली. मात्र, विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी धावपट्टीजवळील अॅप्रनमध्ये ऊग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर साधनसामग्री सज्ज ठेवत सर्व अत्यावश्यक उपाययोजना काही वेळातच पूर्ण केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.









