रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ला शाखेत 50 लाख ऊपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े ग्राहकांनी सोने तारण ठेवलेले अर्धा किलोहून अधिकचे (50 तोळे) सोन्याचे दागिने तिजोरीतून लंपास झाल्याचे समजताच खळबळ उडाल़ी याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कर्ला शाखेतील कर्मचाऱ्यांविऊद्ध गुन्हा दाखल केला आह़े
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून साने तारण कर्ज प्रकरणे केली जातात़ ग्राहकांकडून सोने घेवून त्या बदल्यात कर्ज वाटप करण्यात आले होत़े तारण ठेवलेले सोने बँकेच्या तिजोरीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होत़े दरम्यान ग्राहकाने कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेकडून त्यांचे दागिने परत केले जाणार होत़े मात्र तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर येताच संबंधित कर्मचाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकल़ी त्याने हा प्रकार आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातल़ा यावेळी बँक व्यवस्थापनाने अंतर्गत चौकशी करून कुणी हा प्रकार केला, याबाबत चौकशी करण्यास सुऊवात केल़ी मात्र कुणीही गुह्याची कबुली दिली नाह़ी
जिल्हाभरातील शाखांमध्ये अशा प्रकारचा गुन्हा घडला आहे का, याबाबत तपासणीही बँकेकडून करण्यात आल़ी मात्र केवळ कर्ला शाखेतच हा प्रकार घडला असल्याचे निष्पन्न झाल़े अपहाराची रक्कमही मोठी असल्याने बँक व्यवस्थापनाने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल़ा त्यानुसार गुऊवारी शहर पोलीस ठाण्यात बँकेच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आल़ी
शहर पोलिसांनी याप्रकरणी बँकेच्या कर्मचाऱ्यांविऊद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आह़े गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेला भेट देण्यात आल़ी याठिकाणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. तसेच बँक कर्मचारी यांचे स्टेटमेंट व बँकेचे सीसीटीव्ही तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आह़े
- तारण ठेवलेल्या सोन्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
नुकतेच लांजा येथील एका फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोन्याचे दागिने कर्मचाऱ्यांकडून बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला होत़ा याठिकाणी 26 लाख ऊपयांची फसवणूक करण्यात आली होत़ी तर रत्नागिरी जिल्हा बँकेच्या कर्ला शाखेत सुमारे 50 लाख ऊपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आह़े अशा प्रकारच्या घटनांमुळे तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े








