ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांचा उपद्रव सुरूच
वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये भारतीय दूतावासावर हल्ला झाला आहे. दूतावासावर 21 फेब्रुवारी रोजी रात्री हल्ला झाला आहे. भारतीय कौन्सिल अर्चना सिंह यांनी याची माहिती क्वीन्सलँड पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी परिसरातून खलिस्तानी झेंडा जप्त करत आरोपींचा शोध चालविला आहे. यापूर्वी महाशिवरात्रीच्या दिनी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले होते. भारत सरकारने यासंबंधी ऑस्ट्रेलियाच्या सरकारशी चर्चा केली आहे.
ब्रिस्बेनमधील हा दूतावासर स्वान रोडर असून हा भाग तेथील उपनगरीय आहे. 21 फेब्रुवारी रोजी रात्री काही खलिस्तानवाद्यांनी दूतावासावर हल्ला करत खलिस्तानी झेंडा फेकला होता. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी कौन्सिल अर्चना सिंह यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी त्वरित क्वीन्सलँड पोलिसांना यासंबंधी कळविले. पोलिसांनी तेथे पोहोचून तपास करत दूतावासाला कुठलाच धोका नसल्याचे म्हटले आहे.
खलिस्तानी आतापर्यंत भारतीयांवर हल्ले करण्यासह हिंदू मंदिरांना लक्ष्य करत होते. परंतु आता पहिल्यांदाच त्यांनी थेट भारत सरकारच्या कार्यालयाला लक्ष्य केले आहे. आम्हाला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. दूतावासाच्या पूर्ण भागात आता देखरेख ठेवली जात असून ऑस्ट्रेलियातील सर्व भारतीय आता मिळून सुरक्षेच्या मुद्दय़ावर काम करत आहेत. मेलबर्नमध्ये भारतीयांवर हल्ल्याची घटना घडली होती. आता त्याप्रकारची कुठलीच घटना घडू दिली जाणार असल्याचे अर्चना सिंह यांनी म्हटले आहे.









