चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाचा भराव कोसळला असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर तातडीने जलसंपदा विभागाचे अधिकारी खचलेल्या भागाची पाहणी केली.
रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या एका बाजूचा दगडी भराव कोसळला असून निकृष्ट कामामुळे कळवंडे धरणाला धोका निर्माण झाला असा आरोप ग्रामस्थांचा आहे. धरणाची पाहणी आता जलसंपदा विभागाचे अधिकारी केल्यानंतर धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर धरणाच्या खचलेल्या भागाची दुरुस्ती करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय. अशी माहिती जलसंपदा विभागच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.









