इस्लामाबाद :
पाकिस्तान आता टेस्लाचे मालक एलन मस्क यांच्यावर डोळे वटारत आहे. अलिकडेच मस्क यांची कंपनी स्टारलिंकने पाकिस्तानात स्वत:ची उपग्रहीय इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी अर्ज केला आहे. परंतु आता पाकिस्तानने मस्क यांच्यासमोर माफी मागण्याची अट ठेवली आहे. माफी मागितल्यावरच स्टारलिंकला मंजुरी देण्यात येईल असे पाकिस्तानने म्हटले आहे. मस्क यांच्या ब्रिटनमधील ग्रूमिंग गँगसंबंधी वक्तव्याला पाकिस्तानने मुद्दा केले आहे. मस्क यांनी पाकिस्तानच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप काही पाकिस्तानी खासदारांनी केला आहे.









