जगातील मुख्य 12 धनाढ्यांच्या संपत्तीत घट : ब्लूमबर्गकडून अब्जाधीशांचा निर्देशांक सादर
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क व टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा यांना बुधवारी मोठा तोटा झाला. एका झटक्यात मस्क यांना 10.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,77,97,78,00,000 रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. परंतु, 21 जूनला मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली होती, त्यानंतर टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. यासोबतच मस्कची एकूण संपत्ती 9.95 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र 22 जून रोजी टेस्लाचे शेअर्स 5.46 टक्क्यांनी घसरले, त्यानंतर मस्कची एकूण संपत्ती आता 232 अब्ज डॉलर्सवर आली आहे.टेस्ला व्यतिरिक्त मस्क स्पेसएक्सचे सीईओ देखील आहेत. ते सोलारसिटीचे अध्यक्षही आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स निर्देशांकांने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली, ज्यामध्ये जगातील पहिल्या 12 श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली असल्याची नोंद केली आहे. मस्क यांच्यानंतर, लॅरी पेज यांची एकूण संपत्ती 2.08 अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे. त्याच वेळी, सेर्गे ब्रिनचे 1.96 अब्ज डॉलर्स, स्टीव्ह बाल्मरचे 1.46 अब्ज डॉलर्स आणि जेफ बेझोसचे 1.02 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.भारतीय उद्योगपतींबद्दलची स्थिती पाहिल्यास यामध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना त्यांच्या नेटवर्थमध्ये नफा दिसला आहे. अहवालानुसार, अंबानींची एकूण संपत्ती 330 दशलक्ष डॉलर्सने वाढली, तर अदानींची एकूण संपत्ती 223 दशलक्ष डॉलर्सने वाढली. जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानी 88.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 13 व्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, गौतम अदानी 61.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 21 व्या क्रमांकावर आहेत.
श्रीमंत लोकांच्या यादीत अव्वल स्थानी कोण?
232 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, एलॉन मस्क ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी फ्रान्सचा बर्नार्ड अर्नाल्ट 197 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेफ बेझॉस 149 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याच वेळी, लॅरी एलिसन (135 अब्ज डॉलर) चौथ्या, बिल गेट्स (132 अब्ज डॉलर) पाचव्या, वॉरेन बफे (118 अब्ज डॉलर) सहाव्या, स्टीव्ह बाल्मर (116 अब्ज डॉलर) सातव्या, लॅरी पेज (110 अब्ज डॉलर) डॉलर्स) आठव्या, सर्जी ब्रिन (105 अब्ज डॉलर्स) नवव्या आणि मार्क झुकरबर्ग (त्र्103 अब्ज डॉलर) दहाव्या क्रमांकावर आहेत.









