वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेतील जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘मॅक्रोहार्ड’ या कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञाना आधारित साधनाचे लाँचिंग केले आहे. मानवी कामगारांना पर्याय देण्याची या साधनाची क्षमता आहे. हे साधन एआय रन मायक्रोसॉफ्टचे क्लोन आहे, असे मानले जाते. या लाँचिंगसंबंधी उलट सुलट प्रतिक्रिया आहेत.
मॅक्रोहार्ड हे एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीप्रमाणे कार्य करणार आहे. ते आपल्या सध्याच्या एक्सएआय या साधनाच्या समवेत कार्य करणार आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या बलाढ्या सॉफ्टवेअर कंपन्या हार्डवेअरचे किंवा फिजिकल काँपोनंटस्चे उत्पादन करत नाहीत. ही त्रुटी भरुन काढण्याची क्षमता या नव्या साधनामध्ये आहे, असे प्रतिपादन इलॉन मस्क यांनी शनिवारी केले. या साधनाच्या माध्यमातून मस्क आता सॉफ्टवेअर क्षेत्रावर अधिराज्य गाजवू इच्छित आहेत, असाही या लाँचिंगचा अर्थ काढला जाऊ लागला आहे. अद्याप मॅक्रोहार्ड पूर्णत: विकसीत झालेले नाही, असे बोलले जाते. त्यासाठी मस्क स्वत: सॉफ्टवेअरची कार्यपद्धती शिकत आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे. हे साधन पूर्णत: विकसीत झाल्यानंतर ते मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांशीही स्पर्धा करु शकेल काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, काही तज्ञांच्या मते ही भीती व्यर्थ असून मस्क यांचे हे उत्पादन सॉफ्टवेअर कंपन्यांना पूरक ठरणार आहे.









