ऑनलाईन टीम/ तरुण भारत
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच ट्विटर खरेदी केल्यापासून ते एका मागून एक धक्के देताना दिसत आहेत. मस्क यांनी मालकी आपल्याकडे घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, नव्या मालकीनंतर कंपनीतील बदलांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आणि भीती होती. कर्मचाऱ्यांची ती भीती खरी ठरली. कारण एलॉन मस्क (Former Twitter CEO Jack Dorsey) यांनी ५० टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. आता कंपनीचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागीतली आहे.
इलॉन मस्क यांनी यांनी ५० टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. आता कंपनीचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी भाष्य करत दिलगीरी व्यक्त केली आहे. कर्मचारी कपातीनंतर जॅक डोर्सी यांनी ट्विट करत, “काळ कितीही कठीण असला तरी, त्यातून मार्ग निघतो. सध्याच्या परिस्थितीला मी जबाबदार आहे. मला माहिती आहे यामुळे बऱ्याच लोकांचा राग माझ्यावर आहे. कंपनीत वेगाने बदल केले, याबद्दल माफी मागतो,” अशी खंत जॅक डोर्सी यांनी व्यक्त केली.
ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी शनिवारी इलॉन मस्कच्या कारवाईदरम्यान ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे. “ट्विटरवर काम केलेले अगोदरचे आणि आताचे कर्मचारी अत्यंत हुशार आहेत. कितीही कठीण प्रसंग आले तरी ते नेहमीच मार्ग शोधतील. मला माहित आहे बरेच कर्मचारी माझ्यावर नाराज आहेत. तुम्हाला राग आला आहे. मला मान्य आहे की माझ्यामुळे सर्वांवर ही परिस्थिती ओढावली आहे. मी ही कंपनी खूप लवकर मोठी केली आहे, त्यासाठी मी सर्वाची माफी मागतो”, अशा शब्दांत जॅक डोर्सी यांनी माफी मागितली.









