ऑनलाईन टीम / तरुण भारत :
टेस्लाचे सीईओ एलन मस्क(Elon Musk) पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांच्या संपत्तीमध्ये मागील 24 तासात 6.98 अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मस्क यांची एकूण संपत्ती 187.1 अब्ज डॉलर्स (जवळपास 15.4 लाख कोटी) आहे.
पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. बर्नार्ड यांनी डिसेंबरच्या मध्यात मस्क यांच्याकडून पहिला क्रमांक हिरावून घेतला होता. तेव्हापासून ते प्रथम स्थानावर राहिले. अरनॉल्ट यांना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर मानले जाते. सध्या दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या बर्नार्ड यांची संपत्ती 117 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
तर तिसऱ्या क्रमांकावर उद्योगपती वॉरन बफेट आहेत. त्यांची संपत्ती 144 अब्ज डॉलर्स आहे. त्याखालोखाल बिल गेट्स यांचा नंबर लागतो. त्यांची संपत्ती 106 अब्ज डॉलर्स आहे.
अधिक वाचा : कॉपीमुक्त अभियानाला हरताळ; शिक्षकांकडूनच बारावीच्या विद्यार्थांना कॉपीसाठी मदत









