ऑनलाईन टीम/तरुण भारत
इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये ट्विटरच्या पोस्ट्सना रिप्लाय देणे, उल्लेख करणे आणि सर्च करण्यात प्राधान्यासोबत ट्विटरच्या सबस्क्रिप्शन सेवेला दरमहा ८ डॉलर्स म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये दरमहा मोजावे लागणार आहेत. तसेच, प्रत्येक देशाच्या खरेदी क्षमतेनुसार या फीमध्ये बदल होईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. (elon musk announced 8 dollars charges for twitter account verification and blue tick)
दरम्यान, एलॉन मस्क यांनी मंगळवारी ‘ट्विटर ब्लू’ (blue tick) च्या नव्या व्हर्जनची घोषणा केली. ज्यामध्ये ट्विटरच्या पोस्ट्सना रिप्लाय देणे, उल्लेख करणे आणि सर्च करण्यात प्राधान्यासोबत ट्विटरच्या सबस्क्रिप्शन सेवेला दरमहा ८ डॉलर्स आकारण्याची त्यांची योजना आहे. तसेच, प्रत्येक देशाच्या खरेदी क्षमतेनुसार या फीमध्ये बदल होईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
ट्विटरच्या या ‘ब्लू टिक’ सेवेचे अनेक फायदे असतील, असे मस्क यांनी म्हटले आहे. ”रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये नव्या धोरणानुसार वापरकर्त्यांना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय वापरकर्त्यांना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही वापरकर्त्यांची सुटका होईल”, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.
हे ही वाचा : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर गॅस टँकर उलटला; तीन किलोमीटर परिसरात बंदी