जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आज कोल्हापुरात राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्य़ात आले आहे. कोल्हापुरातील गांधी मैदानात हजारोच्या संख्येने आंदोलनकर्ते जमा झाले असून मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चाचे आयोजन आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्य़ेने शासकीय, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोर्चात सहभागी सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील,आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण दादा लाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, यांच्यासह सर्व शासकीय निमशासकीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मनपा कर्मचारी समन्वय समिती कोल्हापूर आणि जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अधिकारी सहभागी झाले आहेत.
Previous Articleदेशात बदलाचे वारे तयार होतेय..
Next Article विधानसभेला 200 तर लोकसभेला 40 जागा जिंकू









