मुंबई : एल्गार परिषद आणि माओवादी संबंध या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ज्योती जगताप यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देण्यास सोमवारी नकार दिला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांच्याविरुद्ध केलेला खटला प्रथमिक दृष्टया सत्य असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रिय तपास यंत्रणा (NIA)ने असा आरोप केला होता की, बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेच्या कारवाया शहरी भागात पसरवण्याचे काम श्रीमती जगताप करत आहेत. सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये दलितांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. तपासयंत्रणेच्या म्हणण्यानुसार, 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेमध्ये प्रक्षोभक भाषणे करण्यात आली. ज्यामुळे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार भडकला होता.
न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि एमएन जाधव यांच्या खंडपीठाने जगताप यांनी दाखल केलेले अपील फेटाळून लावून विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत जामीन देण्यास नकार दिला आहे.
Previous Articleशिंदे गटातर्फे आडेली गावातील रस्त्याची साफसफाई
Next Article गज्या मारणे टोळीतील आणखी एक आरोपी अटकेत








