राधानगरी तालुक्यातील 2500 शासकीय कर्मचारी संपात
राधानगरी / महेश तिरवडे
राधानगरी तालुक्यातील सुमारे अडीच हजार सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी आज राधानगरी तहसील कार्यालयावर प्रचंड जनसमुदायासह एल्गार पुकारला, शासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राधानगरी तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर, महसूल कर्मचारी, तलाठी, कोतवाल, सर्व राज्य सरकारी कर्मचारी, कृषी, ग्रामसेवक ,सार्वजनिक बांधकाम खाते, जलसंपदा, पाटबंधारे, आरोग्य, पंचायत समिती, वन विभाग, सामाजिक, वनीकरण असे सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांचा या आंदोलनात समावेश होता.राधानगरी बसस्थानाकापासून रॅलीने येत आंदोलकांकडून राधानगरी तहसील कार्यालय प्रांगणात राधानगरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप भंडारी यांना मागणीची निवेदन देण्यात आले.मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी शासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
या मोर्चात एन. जी. नलवडे, एस के पाटील,के पी पाटील, सागर सरावणे, रमेश तायशेटे, सुरेश संपकाळ,सुभाष खामकर, श्रीकांत रायकर, संजय डवर, सागर पाटील, बाळासो पोवार, आर ए पाटील यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते









