शिरसंगी परिसरात हत्तीचा धुमाकूळ
किणे: हत्तीने दोन महिन्यानंतर सिरसंगीत पुन्हा मोर्चा वळवला आहे. ऐन सुगीवेळीच हत्ती परतल्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. मळणी काढून ठेवलेले भाताच्या पिशव्या शेतशिवारात विस्कटून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ऊस पिकाचेही नुकसान केले आहे.
दोन महिन्यांपासून उचंगी शृंगारवाडी जेऊर चितळे या ठिकाणी वास्तव्यास असलेला हत्ती पुन्हा शिरसंगी येमेकोंड जंगलात परतल्याने भीतीचे वातावरण आहे. हणमंत बुडके, बंदना गाईगडे, शिवाजी सावंत, शामराव दळवी यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर नामदेव मयेकर यांच्या ऊस पिकाचे हत्तीने नुकसान केले आहे.








