वार्ताहर/गुंजी
गेल्या चार दिवसांपासून घोसे खुर्द परिसरात दाखल झालेल्या हत्तीने मंगळवारी रात्री भात आणि नारळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. सदर हत्ती गेल्या आठवड्यापासून या परिसरात वावरत असल्याचे अनेक शेतकऱ्यांतून बोलले जात होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून हत्ती शिवारात शिरुन भात पिकांमधून गेल्याने त्याच्या पायाच्या ठशांमुळे हत्ती आल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली. सदर हत्ती पिकातून गेल्याने भात पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी येथील शेतकरी गुरुदास नेमानी मिराशी यांच्या नारळ बागेत शिरून हत्तीने नारळ झाडांचे नुकसान केले आहे. याची माहिती मिळताच गुंजी सेक्शन फॉरेस्टर राजू पवार आणि बीटगार्ड संतोष जोगी यांनी तात्काळ जाऊन नुकसानीची पाहणी केली व पंचनामा केला आहे. गतवर्षीही या भागात हत्तांrनी धुमाकूळ घालून नारळ, सुपारी बागांचे मोठे नुकसान केले होते.









