ठाकरे गट शिवसेना ग्रा प सदस्य वंदेश ढोलम व युवकांचा पुढाकार
कट्टा / वार्ताहर
मालवण तालक्यातील नांदोस येथे मुख्य विद्युत वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे कट्टा गोकुळआळी परिसरात व बाजारपेठेतील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे त्या वाहिनीवरून कट्टा गोकुळआळी व बाजारपेठ परिसरात काही दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नाही याचा ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता याची ठाकरे गटाचे ग्राप सदस्य वंदेश ढोलम यांनी दखल घेत वायरमन यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी आपल्या कडे मनुष्य बळ कमी असल्याची समस्या सांगितली व मदत करण्याचे आवाहन केले त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य वंदेश ढोलम यांच्यासह युवासेनेचे समीर माळवदे ,निखिल बांदेकर, किरण वाईरकर, उपेंद्र बोडये, सिद्धार्थ हिरवे, दर्शन म्हाडगुत यांनी जागी जाऊन तारेवर तुटून पडलेली फांदी बाजूला करण्यास मदत केली.
यानंतर वायरमन गणेश वारंग, मोहाळे व वायंगणकर यांनी युद्धपातळीवर रात्री 8 वाजेपर्यंत अतिशय कठीण भागात काळोखात काम केले व खंडित वीजपुरठा सुरळीत केला.









