प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने रविवार दि. 12 रोजी शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडीत राहणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत वीजपुरवठा ठप्प राहणार आहे.
भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, टेग्गीन गल्ली, येळ्ळूर रोड, चावडी गल्ली, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, रयत गल्ली, नेकार कॉलनी, निझामियानगर, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, महादेव कॉलनी, समर्थनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस, अनगोळ, विद्यानगर, अंजनेयनगर, राजहंस गल्ली, संत मीरा शाळा रोड, गुलमोहर कॉलनी, पारिजात कॉलनी, ओमकारनगर, भाग्यनगर, आनंदनगर, संभाजीनगर, आदर्शनगर, अन्नपुर्णेश्वरीनगर या परिसरात वीजपुरवठा खंडीत राहणार आहे.
तालुक्याच्या काही भागातही वीजपुरवठा खंडीत
दुरुस्तीच्या कारणास्तव मच्छे उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या गावांना रविवार दि. 12 रोजी वीजपुरवठा खंडीत राहणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 6 यावेळेत संतिबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे या गावांचा वीजपुरवठा बंद राहील. कणबर्गी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांना सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत वीजपुरवठा ठप्प राहणार आहे. त्याचबरोबर वडगाव उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या धामणे, ब्रह्मलिंगहट्टी, मासगोनहट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळी, कोंडसकोप, हलगा, बस्तवाड या परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे.









