न्हावेली / वार्ताहर
न्हावेली पंचक्रोशीत कालपासूनच मान्सूनपूर्व पावसाने गडगडाटासह जोरदार हजेरी लावली.मात्र या पावसाच्या तडाख्याने वीज गायब झाली.मात्र काल दुपारपासूनच वीज गायब झाल्याने सायंकाळी सगळीकडे काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.त्यातच विजेचा लपंडाव सुरुच असून वीज ये जा करत असल्याने विजेच्या उपकरणांना त्याचा फटका बसत आहे एक मिनिट पण वीज राहत नाही.सारखी येते जाते त्यामुळे याचा फटका घरातील विद्युत उपकरणांना बसत आहे.यासंबंधी विद्युत पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता दुरुस्तीचे काम चालू आहे.असे त्यांनी सांगितले पण रात्र झाली तरी विजेचा अजून पत्ताच नाही त्यामुळे न्हावेली पंचक्रोशीत सर्वत्र अंधार पसरलेला दिसत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









