तुटलेल्या वीज खांबाबाबत वीज वितरणचे वेधले लक्ष
मालवण : प्रतिनिधी
मालवण चिवला बीच सेवांगण मार्गांवरील वीज खांब मधून काहीसा तुटल्याने धोकादायक स्थितीत होता. स्थानिक नागरिकांनी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यतीन खोत यांनी वीज विभागाचे लक्ष वेधून तात्काळ वीज खांब बदलण्याबाबत पाठपुरावा केला. त्यानुसार धोकादायक स्थितीतील वीज खांब बदलण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी यतीन खोत यांसह वीज विभागाचे आभार मानले.









