तांत्रिक अडचणींमुळे हेस्कॉमचा निर्णय : ग्राहकांची मात्र गैरसोय
बेळगाव : डिजिटल इंडियामुळे प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल घडत गेले. त्याचप्रकारे घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा फोन पे, गुगल पे यासारख्या मोबाईल वॉलेटमुळे ग्राहकांना मिळाली. परंतु मागील महिनाभरापासून या सेवांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने तुर्तास तरी मोबाईल अॅप्लिकेशनमधून बिल भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. गुगल पे, फोन पे, अॅमेझॉन पे, पेटीएम या मोबाईल अॅप्समधून विद्युतबिल भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. संबंधीत कंपनी व हेस्कॉमचा सर्व्हर यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने हेस्कॉमने 18 मार्चपासून मोबाईल अॅप्समधून बिल भरण्याची सेवा तात्पुरत्या स्वऊपात बंद केली. परंतु यामुळे ग्राहकांचे हेलपाटे वाढले आहेत. वेबसाईटवर बिल भरावे असे सांगण्यात येत असले तरी ते भरताना ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही सेवा लवकर सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
कुठे भराल विद्युत बिल
हेस्कॉमने आपल्या ग्राहकांना घरबसल्या विद्युतबिल भरण्यासाठी आपल्या वेबसाईटवरून व्यवस्था करून दिली आहे. शहरी भागातील ग्राहकांसाठी पेम्दस्.म्द.ग्ह व ग्रामीण भागातील ग्राहक पेम्दस्दहत्ग्हीन्ग्मे.हेदtि.ग्ह यावर जाऊन विद्युत बिल भरू शकतात. त्याचबरोबर शहरी भागात असणारे हेस्कॉमचे बिल भरणा केंद्र, बेळगाव वन केंद्र येथेही बिल भरू शकतात. ग्रामीण भागातील नागरिक त्या त्या उपकेंद्र अथवा गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये दिलेल्या तारखांमध्ये बिलाची रक्कम भरू शकतात.
हेस्कॉमच्या वेबसाईटवर ऑनलाईन बील भरावे : एम. टी. अप्पण्णावर (कार्यकारी अभियंता हेस्कॉम)
गुगल पे, फोन पे, अॅमेझॉन पे, यासारख्या मोबाईल वॉलेटमधून विद्युत बिल भरताना समस्या येत आहेत. काही तांत्रिक अडचणी येत असल्याने काही दिवसांसाठी ही सेवा बंद करण्यात आली असून, तोवर ग्राहकांनी हेस्कॉमच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन बील भरावे असे त्यांनी सांगितले.









