ओलाच विक्रीत अव्वल, इतरांचीही उत्तम कामगिरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यावर्षी मे महिन्यामध्ये 1 लाख 4829 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली असल्याची माहिती फाडा या संघटनेने दिली आहे. एप्रिल 2023 या महिन्यामध्ये 66,466 इतक्या इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करण्यात आल्या होत्या. सदरच्या इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीमध्ये अर्थातच ओला ही नेहमीप्रमाणेच इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करण्यामध्ये आघाडीवर राहिली आहे.
कोणी किती विक्री केल्या
मे 2023 मध्ये ओला इलेक्ट्रिकच्या 28 हजार 469 दुचाकी विक्री झाल्या आहेत. मे 2022 मध्ये संख्या 9269 इतकी होती. तर एप्रिल महिन्यामध्ये कंपनीने 21882 दुचाकींची विक्री केली होती. महिना दर महिना याप्रमाणे पाहता विक्रीमध्ये कंपनीने 30 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. दुसऱ्या नंबरवर टीव्हीएस मोटर ही कंपनी राहिली आहे. टीव्हीएस मोटर्सने मे महिन्यात जवळपास 20 हजार 261 दुचाकींची विक्री केली आहे. 2022 च्या मे मध्ये कंपनीने 478 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली होती. महिना दर महिना पाहता कंपनीने जवळपास 132 टक्के इतकी टक्के इतकी दमदार लक्षणीय अशी वाढ विक्रीमध्ये नोंदवली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अॅथर एनर्जी कंपनी राहिली असून त्यांनी मे 2023 मध्ये 15,226 दुचाकी विकल्या आहेत. एप्रिल 2023 मध्ये 7 हजार 746 दुचाकींची विक्री कंपनी केली होती. चौथ्या नंबरवरील बजाज ऑटोने 2023 मध्ये 10 हजार 28 इलेक्ट्रिक दुचाकी विक ल्या आहेत. यापाठोपाठ ओकाया 3875 दुचाकी विक्रीसह पाचव्या नंबर वर राहिली आहे. यांच्यानंतर हिरो इलेक्ट्रिक आणि हिरो मोटो कॉर्प यांचा नंबर आहे.









