इलेक्ट्रिक वाहन पोर्टल ‘वाहन’कडून एप्रिलमधील आकडेवारी सादर
नवी दिल्ली
सरकारच्या दंडात्मक कारवाईच्या धोरणामुळे दुचाकी नोंदणीत एप्रिलमध्ये काहीशी मंदावली होती. एप्रिलमध्ये 62 हजार 581 इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी झाली आहे. जी मार्चमध्ये जवळपास 82 हजार 292 इतकी होती. ई वाहन पोर्टल वाहन यांनी यासंदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे.
4 कंपन्यांची विक्री घसरली
या कॅलेंडर वर्षात चार महिन्यात ओकीनावा, हिरो इलेक्ट्रिक, अॅथर एनर्जी आणि टीव्हीएस या सर्व इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांनी नव्या विक्रीत फारशी चांगली कामगिरी नोंदवलेली नाही. यात फक्त ओला इलेक्ट्रिक मात्र अपवाद ठरली आहे. मार्चच्या आकडेवारीला मागे टाकत ओलाने एप्रिलमध्ये 21 हजार 560 वाहनांची विक्री करत आघाडी कायम राखली आहे. यंदाची एप्रिलची ओलाची विक्री कॅलेंडर वर्षात सर्वोत्तम ठरली आहे.

दंडात्मक कारवाईचा परिणाम
मार्चमध्ये सहाव्या क्रमांकावर असणारी बजाज ऑटो चेतकमुळे पाचव्या क्रमांकावर पोहचू शकली आहे. अॅथर मात्र एप्रिलच्या विक्रीत तिसऱ्या स्थानी राहिली आहे. हिरो इलेक्ट्रिक व ओकीनावा यांच्यावर अलीकडेच अवजड उद्योग विभागाने दंडात्मक कारवाई केल्याचे सांगण्यात येते. याचा नकारात्मक परिणाम इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीवर दिसला आहे. दोन्ही कंपन्यांची पडताळणी सुरु असून नियमाप्रमाणे दोन्ही कंपन्यांकडून प्रक्रिया झालेली नसल्यास सबसिडीपासून यांना वंचित राहावे लागणार आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये यांच्या दुचाकी विक्रीत 42 टक्के घसरण दिसली आहे. हिरो इलेक्ट्रिक ही इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीतील आघाडीवरची भारतातील कंपनी होय. पण 2019 ते 2021 या काळात कंपनीला कोरोनाचा मोठा फटका बसला. साहित्याच्या पुरवठ्याबाबत अडचणी कंपनीला झेलाव्या लागल्या होत्या. पण नंतर दाखल झालेल्या ओला, बजाज, टीव्हीएस, कायनेटीक, ओकाया यांना पुरवठा साखळी पूर्ववत झाल्याचा उलट फायदा उठवता आला.









