सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज आहे. त्यात दुचाकीची सर्वाधिक मागणी होत आहे. वाहन उत्पादक कंपनी देखील कमीत कमी किमतीत दर्जेदार वाहन उत्पादन करण्यावर भर देत आहेत. त्याताच आता ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ आणि ‘इलेक्ट्रिक ट्रक’ देशात लॉंच होणार आहेत. नुकतेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे येथे बोलताना याची घोषणा केली आहे.
इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुले कृषी क्षेत्रात मोलाचा बदल पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक ट्रकमुळे उद्योग क्षेत्राला मोलाची कलाटणी मिळणार आहे. या वाहनांची किंमत, क्षमता याबाबतची माहिती लवकरच समोर येणार आहे.
याआधी गडकरी यांनी बेळगावमध्ये बोलताना फ्लेक्स इंजिन निर्मितीबाबत माहिती दिली होती.