सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. गेली अडीच ते तीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. परंतु ,आता आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका होतील. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींकरिता ही निवडणूक होणार अशी माहिती निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आली आहे.
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे
नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात- 10 नोव्हेंबर
नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत -17 नोव्हेंबर
नामनिर्देशन छाननी कार्यक्रम -18 नोव्हेंबर
अपील नसल्यास माघारीचा दिवस -21 नोव्हेंबर
अपील असल्यास माघारीचा दिवस- 25 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह व अंतिम यादी जाहीर करण्याचा दिवस- 26 नोव्हेंबर
प्रत्यक्ष मतदान दिनांक- 2 डिसेंबर
प्रत्यक्ष मतमोजणी व निकाल दिनांक 3 डिसेंबर









