वृत्तसंस्थ/ नवी दिल्ली
अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनची निवडणूक 21 डिसेंबरला घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या मतदानानंतर त्याच दिवशी निकाल घोषित केला जाईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी निवृत्त न्यायाधीश एम. एम. कुमार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीपूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जामुळे तहकुब करण्याचा निर्णय देण्यात आला होता. 21 डिसेंबर रोजी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया येथील ऑलिम्पिक भवनमध्ये आयोजित केली आहे.









