आज अखेर ३५३ उमेदवारी अर्ज दाखल
वाकरे प्रतिनिधी
कुडीत्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी १६९ उमेदवारांनी १९३ उमेदवारी अर्ज दाखल केले.बुधवारअखेर ३५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कुंभी कासारी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार दि.६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.पहिल्या दिवशी २, सोमवारी ७१,मंगळवारी ८७ तर बुधवारी १९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
बुधवारी १२१ उमेदवारी अर्जांची विक्री तर बुधवारअखेर विक्रमी ७१९ उमेदवारी अर्जांची विक्री झाली.आज १६९ उमेदवारांनी दुबार अर्जासह १९३ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे बुधवारअखेर ३०८ उमेदवारांनी ३५३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कारखान्याचे विद्यमान चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके, व्हाईस चेअरमन निवास वातकर (सांगरुळ),संचालक अनिल पाटील (वाकरे), संजय पाटील (खुपिरे), किशोर पाटील (शिरोली), आनंदा पाटील,भगवान पाटील,आबा पाटील,बाजीराव शेलार (कुडीत्रे), दादादो लाड (गणेशवाडी),आनंदराव माने,शकुंतला माने,(माजगाव), पुंडलिक पाटील (आमशी), पांडुरंग दाभोळकर,भगवान पाटील ,कृष्णात पाटील (कोगे),राहुल खाडे(सांगरुळ),बुध्दीराज पाटील (महे),यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश देसाई ,संचालक नामदेव मोळे(घरपण),निवास पाटील (ठाणे),सुभाष पाटील,बी बी.पाटील,भगवान दत्तू पाटील,नयना पाटील (वाकरे), दादासो पाटील (सातार्डे),हंबीरराव चौगले (मरळी),राजश्री भोगावकर,रेखा पाटील,प्रकाश पाटील(तिरपण) यांचा समावेश आहे
बुधवारी गटवार दाखल झालेल्या अर्जांची संख्या
गट क्रमांक १ – २५
गट क्रमांक १ – २५
गट क्रमांक २- २९
गट क्रमांक ३ – २८
गट क्रमांक ४ – १९
गट क्रमांक ५ – २७
अनुसूचित जाती जमाती – ११
महिला प्रवर्ग २९
इतर मागासवर्गीय गट -१९
भटक्या व विमुक्त जाती जमाती – ६
कारखान्याचे विद्यमान चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील “नरके आघाडीच्या” विद्यमान संचालकांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी केली होती.निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवार दि.१२ ही अंतिम मुदत आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.विक्री झालेल्या अर्जाचा विचार करता ४०० उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. -अनिल व संजय पाटलांचे शक्तीप्रदर्शन
कुंभी कारखान्याचे विद्यमान संचालक संजय पाटील (वाकरे) व संजय पाटील यांनी शेकडो गाड्या आणि कार्यकर्त्यांसह प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.









