वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे माजी अध्यक्ष संजय कपूर यांची फिडेच्या इंडिया विभागीय अध्यक्षपदी निवड एकमताने करण्यात आली. अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनच्या झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली. सदर वार्षिक बैठक अहमदाबादमध्ये घेण्यात आली होती. आता संजय कपूर हे चार वर्षांच्या कालावधीसाठी विभागीय अध्यक्ष म्हणून राहतील.









