सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड झाली आहे. गेली अनेक वर्षे ते भाजपामध्ये निष्ठावान म्हणून काम करत आहेत . सध्या ते जिल्हा सरचिटणीस पदावर काम करत होते. मावळते जिल्हाध्यक्ष राजन तेली गेली तीन वर्षे जिल्हाध्यक्ष पदावर होते. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नव्या अध्यक्ष निवडीसाठी गेल्या दोनमहिन्यांपासून चाचपणी सुरु होती. अनेक नावे त्यासाठी चर्चेत होती आणि स्पर्धेतही होती . अखेर भाजपचे निष्ठावान असलेल्या प्रभाकर सावंत याची भाजपा प्रदेश स्तरावरून सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदासाठो निवड करण्यात आली . संघटन कौशल्य असलेले प्रभाकर सावंत अनेक वर्षे भाजपात काम करत असून राजकीय क्षेत्राबरोबरच समाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही काम करत आहेत . सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण समितीवरही त्यांनी काम केलेले आहे .









