प्रतिनिधी /कुंकळ्ळी
बाळ्ळी येथील बाळ्ळी महाल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. यासाठीची सर्वसाधारण सभा संस्थेच्या बाळ्dळी येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ही निवडणूक प्रक्रिया केपे सहकार उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी विनोद नाईक यांच्या देखरेखीखाली झाली. यावेळी अध्यक्षपदी पुन्हा एकदा नारायण फळदेसाई यांची निवड झाली, तर सचिवपदी राममूर्ती फळदेसाई यांची निवड झाली असून ते सर्वाधिक काळ या संस्थेवर सचिव म्हणून काम पाहत आले आहेत. उपाध्यक्षपदी नरेंद्र फळदेसाई यांची निवड झाली असून या समितीवर अनिल फळदेसाई, दीपक फळदेसाई, आनंद नाईक देसाई, एल्टन डिकॉस्ता, कांचन फळदेसाई, अलका फळदेसाई, दर्शनी नाईक व विठोबा वेळीप हे संचालक म्हणून निवडले गेले आहेत. निर्वाचन अधिकारी विनोद नाईक यांनी सोपस्कार पूर्ण करून नवीन संचालक मंडळ जाहीर केले.









