प्रतिनिधी /कुंभारजुवे
कुंभारजुवेचे काँग्रेसचे आमदार राजेश फळदेसाई यांना नगर नियोजन मंडळात स्थान देण्यात आले आहे. पर्येच्या आमदार दिव्या राणे या मंडळातील दुसऱया प्रतिनिधी आहेत.
गोवा विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या मान्सून सत्रात सभापती रमेश तवडकर यांनी सभागृहाला आमदार राजेश फळदेसाई व आमदार डॉ दिव्या राणे यांची टीसीपी मंडळावर एकमताने निवड झाल्याची माहिती दिली.
टीसीपी मंडळावरील आपल्या नावाची घोषणा केल्याने मला आनंद झाला आहे. टीसीपी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य म्हणून माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आमदार राजेश फळदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.









