Election of Jawad Hussain Abdul Khatib to the post of Sateli-Bhedshi Tantamukta president
ग्रामपंचायत साटेली भेडशी तंटामुक्त अध्यक्ष पदी जवादहुसेन अब्दूल गनी खतीब (बाबा खतीब) यांची निवड
करण्यात आली.साटेली भेडशी तंटामुक्त अध्यक्ष महेश धर्णे यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त होते. गुरुवारी झालेल्या तहकूब ग्रामसभेत नूतन तंटामुक्त अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसभेला जवादहुसेन अब्दूल गनी खतीब हे या पदासाठी एकमेव इच्छुक असल्याने त्यांची ग्रामसभेने एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सरपंच लखू खरवत, उपसरपंच गणपत डांगी, ग्रामविकास अधिकारी श्रीम.डोंगरदीवे ग्रामपंचायत सदस्य नामदेव धर्णे, रामचंद्र भिसे,सूर्यकांत धर्णे, प्रकाश कदम,लक्ष्मी धर्णे यांनी श्री.खतीब यांचे अभिनंदन केले.तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
साटेली / भेडशी प्रतिनिधी









